श्लोक ३ - मेघदूत

 तस्य स्थित्वा कथमपि पुरः कौतुकाधानहेतोः
अन्तर्बाष्पश्चिरमनुचरो राजराजस्य दध्यौ।
मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्ति चेतः
कण्ठाश्लेषप्रणयिनि जने किं पुनर्दूरसंस्थे ॥ ३॥

शब्दार्थ: 

पुरः - च्या समोर

अन्तर्बाष्प: - डोळ्यात जमणारे बाष्प - अश्रुच्या आधीची स्थिती. 

मेघालोके - मेघ आलोके. 

 तस्य स्थित्वा कथमपि पुरः कौतुकाधानहेतोः
अन्तर्बाष्पश्चिरमनुचरो राजराजस्य दध्यौ।
मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्ति चेतः
कण्ठाश्लेषप्रणयिनि जने किं पुनर्दूरसंस्थे ॥ ३॥

अनुचर: तस्य पुर: चिर दध्यौ 
कोणाचा अनुचर : राजराजस्य - कुबेराचा
का खूपवेळ थांबला: कौतुकाधानहेतो:
कसा: कथमपि स्थित्वा
तस्य कोण: मेघ
अनुचराची स्थिती कशी: अन्तर्बाष्प

मेघालोके सुखिनोपि अन्यथावृत्ति चेत: भवति
किं पुनः कण्ठाश्लेषप्रणयिनि र्दूरसंस्थे जने (वृत्ति चेत:) 
(तर गळ्याला मिठी मारणारी प्रणयिनी दूर आहे अश्या लोकांची काय अवस्था होत असेल!)


Notes
  • यक्ष हा नायक असल्याने त्याची धिरोदात्त स्थिती दाखवण्यासाठी अंतर्बाष्प - म्हणजे - अश्रु येऊ न देण्य़ाचा प्रयत्न करणारा. 
  • मेघाकडे - कौतुकाने - काम हेतूने - आपलं काम हा करेल का वगैरे विचार करत थांबला होता. 
  • मेघाचा गडगडात ऐकून गळ्याला मिठी मारेल अशी कल्पना
  • तिसऱ्या चौथ्या ओळीत अर्थांतर्न्यास अलंकार - म्हणजे सामान्य विधात पण विशिष्ठाला लागू



Comments