इश्किया

विशाल भारद्वाजच्या बॅनरवर, अभिषेक चौबे चा इश्किया झणझणीत मिरचीच्या ठेच्यासारखा आहे. गावरान, जोरकस आणि चैनबाज.
चार गावचे पाणी प्यायलेले दोन भुरटे चोर आपल्या भुतकाळापासुन पळता पळता एक बाई, एक सेना, एक अपहरण आणि एका सुडाच्या मधोमध येउन आदळतात त्याची गोष्ट म्हणजे इश्किया.
Completely unapologetic in its adult language, humor and topic. उगाच कुठलाही संस्कार, राजकिय टिप्पणीचा आव न आणणारा.
आपल्या बाईपणाची जाणिव असणारी, त्याचा पुरेपुर फायदा घेणारी कृष्णा, aggressive शारीर बब्बन, आत कुठेतरी सुसंकृतता जपणारा खालुजान यांची जुगलबंदी बघण्यासारखी आहे. विद्या बालन, अर्शद वारसी आणि नासिर पात्रात अगदी फिट्ट बसलेत. इतर पात्रे तर जणुकाही locationवर readymade सापडल्यासारखी चपखल बसतात. मुश्ताक जिजा, कक्कड, नंदु, विद्याधर, कुक्कु, ममता सगळेच. विशालच्या सगळ्या चित्रपटांची ही खासियत आहे.
झणझणित संवाद - ’मौसम तो आशिकाना होते जा रहा है" किंवा ’तुम्हारा इश्क इश्क हमारा ..." ’हमने गलती करनेमे जल्दी कर दी और आपने माफी करनेमे देर कर दी" मजा आणतात.
जुन्या - नवीन हिंदी फिल्मी गाण्यांचा मस्त वापर केला आहे. सुरवातीचा बब्बन - खालुचा डान्स ते अनुपमाच्या "कुछ दिल ने कहा" पर्यंत.
गुलजार - विशाल या जोडीकडुन गाण्यांबद्दल असलेल्या अपेक्षा मात्र पुर्ण होत नाहीत. ईब्ने बतुता आणि दिल तो बच्चा है गाणी दिलला लागत नाहीत.
अभिषेक चौबेचा पहिला प्रयत्न आहे असे कुठे जाणवत नाही पण विशालची छाप प्रकर्षाने जाणवते.
फर्मास पिक्चर - जरुर बघावा.

Comments