वसंतोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुरुवात अजय चक्रवर्तींच्या गाण्याने होती. त्यानंतर त्रिलोक गुर्टु यांचा तालवाद्यांचा कार्यक्रम होता.
शोभा गुर्टुंचे सुपुत्र, त्रिलोक तालवाद्यात उस्ताद आहेत. जॅझ जगतात ते जगभर प्रसिद्द आहेत. त्यांचं प्रस्तुतीकरण ऐकायला अर्थातच खुप उत्सुक होते.
त्रिलोक गुर्टु मस्तपैकी केशरी रंगाचा चौकडयाचा बुशशर्ट आणि केशरी रंगाची पॅंट घालुन रंगमंचावर दाखल झाले. त्यांचा सगळा तालवाद्याचा सरंजाम मांडलेला होता. साथीला सतार, गिटार, सिंथ असा ऑर्केस्ट्रा. आपल्या कोकणी मराठीत त्यांनी प्रोग्रॅमचा ताबा घेतला. ’मी मराठीत बोलणार आहे आणि शास्त्रीय संगीत वाजवणार, क्लासिकल म्युजिक नाही.’ असे सांगुन आपली जादु सुरु केली. त्यांची बोटे खरोखर तालाची जादु करुन दाखवत होती. थोड्या वेळाने अस्वस्थ होत त्यांनी प्रेक्षकांना विचारले, ’असे गंभिर शिक्षा केल्यासारखे का तुम्ही? आपण इथे मजा करायला आनंद करायला आलो. इथे मजा येणार तुम्हाला. असे घट्ट नका बसु.’
साउंडवाल्याने पण त्यांचे डोके खाल्ले होते. त्याच्यावर पण रागावले. हे मला परदेशात कधी करावे लागत नाही म्हणाले. नंतरच्या राहुल देशपांडेच्या निर्गुणी भजनाच्या फ्युजनने खुप मजा आली. त्याचा आवाज आणि भजनाचे वजन छान जमले होते. नंतर अजुन फ्युजन वाजवले. शेवटी त्या सर्वात नृत्याचा समावेश झाला.
कार्यक्रम रंगला. पण एकसंधता राहिली नाही असे मला वाटले. फक्त त्रिलोकजीना वाजवायला अजुन वेळ द्यायला हवा होता. लोकांना ते आवडणार नाही म्हणुन इतके आयटम घातले असतील तर त्यांनी रसभंग केला. माझ्यामते पुणेरी प्रेक्षक एवढा चोखंदळ निष्चित आहे की तो एकसंध तालवाद्य परफॉर्मन्स चा लुत्फ घेउ शकतो.
त्रिलोक च्या कॉमेंटस एकदम मार्मिक होत्या. एका ऊठुन जाणा-या बाईंना त्यानी समजावले - ’बाई जाउ नका - आम्ही खुप मजा करणार अजुन. मराठी लोकांची अशी पद्धत नसते. रेस्टॉरंटमध्ये गेलो तरी सगळ्या डिश संपल्याशिवाय उठत नाही आपण’ :)
कार्यक्रम निनादला नक्कीच पण फक्त तालवाद्ये असती तर अजुन एकसंध ठरला असता.

Comments
Post a Comment