छंद मकरंद

परंपारिक भारतीय काव्याचा गेयता हा स्थायी भाव आहे. काव्याला ही गेयता येते, ते छंदबद्ध असल्याने. छंद म्हणजे कवितेच्या ओळीत वापरलेल्या अक्षरांची नियमबद्ध रचना.

लघु अक्षरे (I) -इकार, उकार, ऋकार, अंकार, अःकार हे लघु.
गुरु अक्षरे (S) - आ-कार, ईकार, ऊकार, ॠकार, ए-ऐ-ओ-औ-कार हे गुरू अनुस्वारयुक्त अक्षर आणि विसर्गयुक्त अक्षर गुरू.जोडाक्षराच्या आधीचे अक्षर त्यावर उच्चार करताना आघात येत असेल तर गुरू समजले जाते. क्ष, ज्ञ ही जोडाक्षरे असल्याने त्यांच्या आधीचे अक्षर गुरू.

कवितेतील ओळीचे 3 अक्षरांचा एक असे भाग पाडले जातात, त्यांना गण म्हणतात. शेवटी उरणारी 1 - 2 अक्षरे तशीच सोडली जातील. 

ह्या गणांचे 9 प्रकार होतात 

य  - आद्य लघु  र - मध्य लघु  त  अंत्य लघु  न  सर्व लघु
भ  - आद्य गुरु  ज  - मध्य गुरु  स - अंत्य गुरु म सर्व गुरु

हे लक्षात ठेवायची आणिक एक युक्ती यमाताराजभानसलगं 

य - यमाता
म - मातारा ....

आता या गणांची ओळीत होणारी विशिष्ट रचना म्हणजे गणवृत्त

भुंजगप्रयात
12 अक्षरी गणवृत्त

भुजंगप्रयाती य ये चार वेळा.

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥


गणाधी  शजोई  शसर्वां गुणांचा
I S S    I  S S  I S S  I S S

मुळारं  भआरं  भतोनि र्गुणाचा
I S  S  I  S S  I S S  I SS   -  र्गु हे जोडाक्षर असल्याने आधिचे नि गुरु झाले. 

मालिनी
न न म य य गणांनी मालिनी वृत्त होते.  15 अक्षरी 

अनुदिनि अनुतापे,तापलो रामराया
परमदिनदयाळा नीरसी मोह माया |

ह्या वृत्तात प्रत्येक ओळीची पहिली 6 अक्षरे लघु आहेत. 

 मंदाक्रांता 


17 अक्षरी वृत्त -  म भ न त त आणि शेवटची दोन अक्षरे गुरु

 मंदाक्रांता म्हणति तिजला, वृत्त हे मंद चाले |
ज्याच्या पादीं म भ न त त हे, आणि गा दोन आले ||

 शार्दूलविक्रीडित 

19 अक्षरी - म स ज स त त आणि गुरु

आहे वृत्त विशाल त्यास म्हणती शार्दूलविक्रीडित
मा सा जा स त ता ग येति गण हे पादास की जोडित.

वसंततिलका


14 अक्षरी - तभजज आणि शेवटची दोन अक्षरे गुरु 


 शिखरिणी

17 अक्षरी - य म न स भ लघु गुरु

तया वृत्ता देती विबुधजन संज्ञा शिखरिणी
जयामध्ये येती य म न स भ ला गा गण गणी.

मंदारमाला

22 अक्षरी त त त त त त  त गुरु

मंदारमाला कवी बोलती हीस कोणी हिला अश्वघाटी असे
साता तकारी जिथे हा घडे पाद तेथे गुरू एक अंती वसे.

अनुष्टुप छंद


हयात लघु गुरु चे नियम आहेत पण गण नाहीत. 

प्रत्येक ओळ 8 अक्षरी. पाचवं अक्षर लघु सहावं गुरु.  विषम ओळीत सातवं गुरु सम ओळीत सातवं लघु


श्लाके षष्ठं गुरु ज्ञेयं सर्वत्र लघु पंचमम्।
द्विचतुष्पादयोर्ह्रस्वं सप्तमं दीर्घमन्ययोः॥

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्‌ ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्‌ ॥१॥

चरितं रघुनाथस्य  घु  - पंचम लघु  ना षष्ठं गुरु  थ - प्रथम पाद सप्तम गुरु
 शतकोटि प्रविस्तरं  - प्र लघु  वि हे पुढे स्त आल्याने गुरु आणि स्त लघु  द्वितिय पाद
एकैकमक्षरं पुंसां  क्ष लघु रं गुरु पुं  गुरु 
महापातकनाशनं  क ना श 


 इंद्रवज्रा
11 अक्षरी - त त ज आणि गुरु गुरु 

ती इंद्रवज्रा म्हणिजे कवीने
ता ता ज गा गा गण येति जीने
त्या अक्षरे येति पदात अक्रा
'तारी हरी जो धरि शंखचक्रा

* उपेंद्रवज्रा
11 अक्षरी - ज त ज आणि गुरु गुरु 

उपेंद्रवज्रा म्हणतात तीला'
ज ता ज गा गा गण येती जीला

त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देव-देव॥  शेवटच्या अक्षरावर आघात येत असल्याने ते लघु असले तरी गुरु धरले जाते.
I S I   S S I  I S I SS 


कवित्त  - हा हिंदी अक्षरछंद आहे. 

31 अक्षरी  - 16 - 15 असे भाग पडतात.   31 वे अक्षर गुरु. योग्य गेयता येण्यासाठी 8 8 8 7 भाग पाडणारे यति यावेत. यति म्हणजे जे अक्षर उच्चारल्यावर किंचित थांबावे लागते. 

तेज तमअंस पर  कन्ह जिमि कंस पर
त्यो म्लेंच्छ बंस पर  शेर शिवराज हैं|


तुम्हाला माहित असलेल्या वृत्त कविता सांगा, त्यांचा समावेश करते इथे.

पुढच्या भागात मात्रावृत्त...

Comments