The Clothing of Books

नुकतेच *झुम्पा लाहिरी ह्या जागतिक कीर्तीच्या लेखिकेचे "The Clothing of Books" नावाचे एक पुस्तक वाचले. पुस्तक छोटेसेच आहे, जेमतेम ६५ पानी. पुस्तकांच्या मुखपृष्ठांवर एक मोठा निबंध म्हणता येईल, इतपतच पुस्तकाचा आवाका आहे. ह्या साध्या, सोप्या विषयाचा विविध बाजूंनी आढावा घेतला आहे लेखिकेने. मुखपृष्ठे कशासाठी, पूर्वी कशी होती, आता कशी असतात, पुस्तकातील मजकुराशी त्यांच्या संबंध असतो का, असावा का इत्यादी विविध मुद्द्यांचा उहापोह ह्या पुस्तकात होतो.

The Charm of the Uniform ह्या पहिल्याच भागात ती शाळेचा गणवेष आणि पुस्तकाचे cover ह्यातील साधर्म्य शोधते. तिच्या शालेय वयात - घरून तद्दन भारतीय संस्कार आणि अमेरिकन संस्कृतीशी रोजची गाठ ह्यात तिच्या मनाची झालेली घालमेल ह्याबद्दल विस्ताराने ती लिहिते. तेव्हा आलेल्या कटू अनुभवांमुळे असेल कदाचित, सर्वांना समान दिसण्यास मदत करणारी गणवेष पद्धती तिला आजही आवडते.  तिच्या मते मुखपृष्ठ म्हणजे जणू पुस्तकांचे कपडे. लेखक मुखपृष्ठे तयार करण्याच्या प्रक्रियेत असतोच असे नाही. एकदा पुस्तक लिहून संपल्यावर, मुखपृष्ठ बनविण्यासाठी मग प्रकाशनातील इतर कलाकार पुढे येतात, त्यांना content ची माहिती दिली जाते, परंतु लेखकाशी प्रत्यक्ष भेट,  त्यांचा संवाद फारसा नसू शकतो. art team  चा उद्देश पुस्तकांच्या दुकानात जिथे पुस्तकांच्या राशीच्या राशी असतात तिथे हे पुस्तक कसे उचलले जाईल ह्यावर मुख्य भर असतो.

त्यामुळे पुस्तक एक म्हणतय आणि cover वेगळेच असेही होते, at  least तिच्याबाबतीतरी असे बऱ्याचवेळा झालेय. अशा एखाद्या न आवडलेल्या पुस्तकाच्या cover  वर कोणी सही मागितली तरी करावीशी वाटत नाही. नक्की कोणी cover केलय हे माहित नसल्याने त्यावर टीकाही करता येत नाही. अशा वेळी तो विषय सोडून देण्याखेरीज विशेष काही करता येत नाही. ती म्हणते - The right cover is like a beautiful coat wrapping my words while wrong cover is  suffocating or like too -light sweater: inadequate.  (cover artist आणि लेखक ह्यांच्यात सुसंवाद असल्यावर तयार होणारे सुंदर पुस्तक ह्यासाठी Virginia Woolf (लेखक) आणि Vanessa Bell (कलाकार) ह्या बहिणींचे उदाहरण देते.)

ती म्हणते - A jacket should fit like a glove. And yet, in my opinion, most of my book jackets don't fit me, which is why I sometimes think, as a writer too, that a uniform would be the answer.

The Naked Book ह्या भागात ती covers नसलेल्या पुस्तकांविषयी लिहिते. असे पुस्तक वाचताना फक्त लेखकाचे शब्दच वाचकाला धरुन ठेवायचे काम करत असतात. ती लिहिते - "To understand them, you had to read them. The naked cover doesn't interfere." ह्या पुस्तकाचे मुखपृष्ठ असेच आहे, पुस्तकातील आशयावर अजिबात टीकाटिप्पणी न करणारे. फिक्या डेनिमवर हाताने टाके घातलेत - असे मला ते दिसले.

लेखिकेने नक्कीच अनेकविध मुद्द्यांचा परामर्श घेतला आहे पुस्तकात. परंतु, काही मुद्द्यांची बऱ्याच वेळा पुनरावृत्ती देखील झाली आहे. त्यामुळे पुस्तक किंचित पसरत वाटते आणि त्याची २०० रु किंमतही जास्त वाटते.

*झुम्पा लाहिरी ही भारतीय वंशाची अमेरिकन लेखिका आहे. Namesake, Interpreter  of Maladies , Unaccustomed  earth ही तिची काही पुस्तके. तिला पुलित्झर, हेमिंग्वे असे जागतिक मानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. इंग्रजी आणि इटालियन अशा दोन्ही भाषांत ती लिहिते. हे पुस्तक तिने इटालियन मध्ये लिहिले। तिच्या नवऱ्याने, आल्बेर्तोने त्याचे इंग्रजीत भाषांतर केले आहे.

Comments