वसंतोत्सव 2019

वसंतोत्सव 2019 -  18, 19 20 जनेवारी

प्रथम दिवस
सारंगी वादन - उस्ताद मोईनुद्दीन आणि मोमीन खान. खूप साधी माणसं होती. पुणेरी संगीत बैठकींचा आगाऊ ठसका लागला नव्हता त्यांना अजून
शौनक अभिषेकी -  मारवा आणि कल्याण
बेगम परवीन सुलताना - पुरीया धनाश्री,  हंसध्वनी तराणा, भवानी दयानी - बाईंचा आवाज मस्त लागला होता. पार तार ते खर्ज लीलया फिरत होता.
सुरू करायच्या आधी शौनकचं कौतुक करत म्हाणाल्या बहोत अच्छा गाया बच्चेने. फार गोड वाटलं. विशेषत: शौनकने "मी फक्त गाणार आहे" अशी मुक्ताफळे उधळल्याने जरा जस्तच.

द्वितीय दिवस
सप्तशतक - कमलेश भडकमकर, त्याचे झी टीव्ही फेम वादक सहकारी आणि स्पृहा जोशी यांनी खूप छान सादर केलेली instrumental songs. वादक तयारीचे आणि सगळ्यांची आवडती मराठी भावगीतं, मग काय विचारता! रंग तर भरणारंच.
घटम  -  विक्कू घराण्याच्या तीन पिढ्या. पण जरा वेळाने बोर झाले. अर्थात माझ्या ताल अज्ञानामुळे.
राहुल देशपांडे - भरपूर गायला. पण नवीण काय नाय.

तृतीय दिवस 
जादूची पेटी - आदित्य ओक आणि सत्यजीत प्रभू. मस्त आणि संक्षिप्त.  आदित्य ओकचा joy infectious
होता.
आदर्श शिंदे - आदर्श चा आवाज मस्तच आहे. तयारी पण.  सादरीकरण आणि गाण्यांचे सिलेक्षन जमले नाही.  रंजीश ही सही बेस्ट.
संगीत संशयकल्लोळ - प्रयोग मस्त रंगला. गाणी मस्त.  अमेय चे timing. प्रियांकाचा look. भारीच. पण नाटक म्हणून ते आता कालबाह्य झाले असे वाटले.

Comments