आनंद कर्वे - आभाळमाया

ह्या वर्षी लोकसत्तेच्या चतुरंगमध्ये एक नवीन सदर सुरू झालंय. प्रसिद्ध व्यक्तिंची मुलं त्यांच्याबद्दलच्या आठवणी लिहित आहेत. सदराचं नाव आहे - आभाळमाया.
आनंद कर्वे यांनी पहिला लेख लिहिला, त्यांची आई - इरावती कर्वे - बद्दल.  लेख तमाम कर्वे घराण्याला साजेसा, to the point and crisp.
त्यात त्यांनी लिहिलं- इरावती रोज मंगळसूत्र - कुंकू वगैरे काही  सोपस्कार करत नसत. सणासुदीला किंवा समारंभात यजमान कुटुंबाचा मान राखण्यासाठी त्या ते वापरत. त्यांच्या मंगळसूत्राच्या पदकात, एक amber चा मणी होता. तो मणी बनताना, त्यात एक कोळी अडकला होता. त्यामुळे तो दिनूच्या डोळ्याच्या बाहुलीसारखा दिसे.
आठवलं का काही?
दुस्तर हा घाट मध्ये वनमाळीने नमूला दिलेला amber चा मणी.

Comments