ज्ञानदेवांची विरहिणी - अभंग १७०

पांचा दामांचा घोंगडा नेसेन ।
उरली मोट ते मी जेविनगे बाईये ॥१॥
कामारि कामारि कामारि होऊन ।
या गोपाळाचें घरीं रिघेन गे बाईये ॥२॥
त्याचा उंबरा उसिसा करीन ।
वरि वेरझारा मी सारीनगे बाईये ॥३॥
निवृत्ति ज्ञानदेवा पुसतिल वर्म ।
त्यासि कामीन पुरेनगे बाईये ॥४॥

Comments