ज्ञानदेवांची विरहिणी - अभंग १७७

सांवळे परब्रह्म आवडे या जिवा ।  
 मनें मन राणिवा घर केलें ॥१॥  
 काय करुं सये सांवळे गोंवित ।  
 आपेआप लपत मन तेथें ॥२॥  
 बापरखुमादेविवरु सांवळी प्रतिमा ।  
 मनें मनीं क्षमा एक जालें ॥३॥ 

Comments