मश्रु आणि गज्जी


मुस्लिम धर्मात पुरुषांना रेशीम अंगाला लावायला मनाई आहे म्हणे. त्यावर उपाय म्हणून मश्रु सिल्क ची निर्मिती झाली. मश्रु चा अर्थ  permissible, चालणारे.  तर ह्यातले उभे धागे म्हणजे  warp रेशमाचे असतात. आडवे धागे, weft, कापसाचे असतात. त्यामुळे अंगाला कापुस लागतो.  मश्रु हे नाव मिश्र पासुन ही आलं असेल. 

मश्रु कापड बहुतेक करून stripes pattern मध्ये दिसतं



Image source - http://blog.directcreate.com/the-magic-of-mashru-then-now/
A good article about Mashru.

गज्जी सिल्क पण असंच बनतं, रेशीम  आणि  कॉटन  सॅटीन  पद्धतीने विणून. मश्रु आणि गज्जी एकच का - हे नाही माहित.  गज्जी सिल्कची चकाकी वेगळी असते, ते विशेषकरून बांधणी साड्या ओढण्यांसाठी वापरलं जातं गुजरातेत बनतं


                                       

Comments