ज्ञानदेवांची विरहिणी - अभंग १७१

जागृती पुसे साजणी ।   कवण बोलिले अंगणी ।   निरखितां वो नयनीं ।   वृंदावनीं देखियला ॥१॥   मनीं वेधु वो तयाचा ।   पंढरीरायाचा ॥२॥   स्वप्न सांगे सुषुप्ती ।   असे ममता हे चित्तीं ।   विठ्ठल होईल प्रतीती ।   मग गर्जती तुर्ये ॥३॥   मग बोलों नये ऐसें केलें ।   मन उन्मनीं बोधलें ।   बापरखुमादेविवरु विठ्ठलें ।   थितें नेलें मीं माझें ॥४॥  

Comments