ज्ञानदेवांची विरहिणी - अभंग १७४

 मनें करुनि कुटिल उकलुनि श्रृंगारें ।  
 ते लावण्याच्या अपारें पडिलें वो माये ॥१॥  
 माझें कुटिळपण गेलें कुटिळपण गेलें ।  
 गोविंदें वोजाविलें निजरुप वो माये ॥२॥  
 बापरखुमादेविवरु माझें कुटिळ फ़ेडूं आला ।  
 विटेवरी मालाथिला निजरुपें वो माये ॥३॥  

Comments