ज्ञानदेवांची विरहिणी - अभंग १७९

 निळिये निकरें कामधेनु मोहरे ।  
 निळेंपणेसरे निळे नभीं ॥१॥  
 घुमत घुमत निळेमाजि मातु ।  
 निळेपणीं देतु क्षेम कृष्णीं ॥२॥  
 निळिये सागरीं निळे निळेपणें सुंदरी ।  
 रातलीसे हरि विरहिणी ॥३॥  
 ज्ञानदेव सांगे निळियेचे बागे ।  
 निळसंगे वोळलेगे निळीमाजी ॥४॥  

Comments