ज्ञानदेवांची विरहिणी - अभंग १७२

सांवळिये बुंथी सांवळिया रुपें ।  
 सांवळिया स्वरुपें वेधियेलें ॥१॥  
 काय करुंगे माये सांवळे न सोडी ।  
 इंद्रियां इद्रियां जोडी एकतत्त्वें ॥२॥  
 कैसें याचें तेज सांवळे अरुवार ।  
 कृष्णी कृष्ण नीर सतेजपणें ॥३॥  
 ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचे खुणे ।  
 सांवळेची होणें यासी ध्यातां ॥४॥  

Comments