कश्चित् कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः
शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ।
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु
स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ॥ १॥
कश्चित यक्ष वसतिं चक्रे
कसा यक्ष? - स्वाधिकारात्प्रमत्तः, भर्तुः शापेन अस्तंगमित महिमा
कोणता शाप? - कान्ताविरहगुरुणा, वर्षभोग्येण
यक्ष कुठे रहात होता? : रामगिर्याश्रमेषु
कसे होते रामगिरी पर्वतावरचे आश्रम - जिथे जनकतनयास्नानपुण्योदक होतं, जिथं स्निग्धच्छायातरु होते.
शब्दार्थ:
भर्तु - स्वामी, lord master
गुरूणा (कांताविरह्गुरूणा) - इथं याचा अर्थ दुःसह, जड. दुर्भर, दुस्तर(मल्लिनाथ)
Notes
- स्निग्धच्छायातरु कसे तर ज्यांची छाया पानगळीने कमी होत्त नाही असे तरु. मल्लिनाथ म्हणतो की ते नमेरु वृक्ष होते. - नमेरु --- रुद्राक्ष अथवा सुरपुन्नाग
- अस्तंगमित महिमा, अस्तंगत नाही - कारण तो दुसऱ्याने अस्तंगत केलाय - एका वर्षाकरता.
- आश्रमेषु- असे अनेक वचन का तर विरहार्त यक्ष एका ठिकाणी राहू शकत नव्हता- आश्रमातून भटकत होता.
- रामगिरी पर्वत - जो राम - सीतेच्या वास्तव्याने पावन आहे- त्यांच्या इथल्या 'सहवासा'च्या आठवणीने यक्ष अधिक व्याकुळ. तसेच - रामालाही विरह झाला, त्याने हनुमानाला दूत म्हणून पाठवले, ह्या साम्यांकडे लक्षणा- allusion
- कान्ताविरह- भार्या न वापरता कान्ता वापरलंय - प्रिय आहे ती यक्षाला.
- कश्चित - यक्ष. त्याचं नाव घेतलं नाही आहे. ह्यावर अशी टिपण्णी आहे की स्वामी आज्ञा न मानणाऱ्या, शापभ्रष्ट, बायको, माता, पिता यांचं नाव घेऊ नये असा संकेत आहे. आता हया संकेतात शापभ्रष्ट आधी होते का मेघदूतानंतर add झाले we will not know.
- कालिदास आपल्या काव्यात फक्त वाक्य घेऊन मंदाक्रांतेत बसवत नाही तर शब्दांची चतुर रचना करतो. ह्या पूर्ण श्लोकात सगळ्यात महत्व कांताविरहाला असल्याने तो सर्व प्रथम येतो. असे अधिक रचनाविभ्रम आहेत पण लक्षात येतील च असं नाही. शोधण्यात मजा आहे.
Comments
Post a Comment