मेघदूत

मेघदूत हे खंडकाव्य - इतर काव्यांच्या मनाने छोटंसं - 121 श्लोकांचं.

काव्याचा प्रमुख रस रति - शृंगार रस - विप्रलंभ - तत्रोपि उन्मादवस्था. विप्रलंभात - प्रेमविषय प्राप्त नाही आहे.  विप्रलंभ पाच प्रकारचा असतो, त्यातला हा प्रवासवाचकः.

दोन भागात - पूर्व मेघ आणि उत्तर मेघ.मेघदूतमुळे - संस्कृत काव्यात - आणि पंडित काव्यात संदेश काव्यांची परंपरा सुरू झाली. नला ने हंसाद्वारे पाठवलेला संदेश. रुक्मिणी आणि ऊषा ने - असे अनेक.

 मेघदूत चे सगळे श्लोक मंदाक्रांता म्हणजे मंद चालणाऱ्या वृत्तात आहे. कदाचित, मेघाची चाल दाखवण्यासाठी असेल. इतर काही संदेश काव्यांनी ह्याचं अनुकरण करत मंदाक्रन्ता वापरलं

मल्लिनाथ या विद्वान टिकाकाराने मेघदूतावर संजिवनी ही सुंदर टिका लिहिली आहे. ज्यावरून मराठीत मल्लिनाथी करणे हा वाक्प्रचार रूढ झाला.

मंदाक्रांता 

17 अक्षरी वृत्त -  म भ न त त आणि शेवटची दोन अक्षरे गुरु
 मंदाक्रांता म्हणति तिजला, वृत्त हे मंद चाले |
ज्याच्या पादीं म भ न त त हे, आणि गा दोन आले ||

Comments