रेशमाच्या रेघांनी

तलम आणि समारंभी.  रेशमाला भारतीयांच्या मनात विशेष स्थान आहे.  कदाचित चीनमधुन पहिल्यांदा भारतात आलं असेल, म्हणुन संस्कृतमध्ये रेशमाला चिनांशुक म्हटले असेल?  पण  सिंधु संस्कृती काळातलेही रेशमाचे अवशेष सापडलेले आहेत.

भारतात 4 ते 5 प्रकारचे रेशीम कीड्याच्या प्रजातींपासुन रेशीम बनवलं जातं 

  • Bombyx mori   हे  व्यावसायिक रित्या तुतीच्या पाल्यावर वाढवले जातात. किड्यांना कोषातच मारलं जातं. त्यामुळे, जास्त सलग धागा मिळतो. ह्याला मलबरी सिल्क म्हणतात. हे सगळ्यात तलम रेशीम आहे
  • Wild silkworm Antheraea assamensis produces muga silk

कोषापासुन धागा मिळवायची ही रीत हिंसक असल्याने, कीडा कोष सोडून गेल्यावर, रेशीम मिळवायची प्रक्रिया ही प्रचलित झाली, त्याला कोरा किंवा अहिंसा सिल्क म्हणू लागले.देवकार्यात हे वापरण्याची शिफारस होऊ लागली.

कोषापासुन धागे बनवताना, त्यातला काही भाग हा वगळला जातो. त्यापसुन दुसऱ्या प्रतीचे रेशीम बनते. 
मलबरी सिल्क चे दुसऱ्या प्रतीचे सिल्क आहे मटका सिल्क
एरी आणि टसर चे आहे गीचा सिल्क. 

रेशीम धाग्याला असलेला gum गोंद न काढता बनवलेले कापड रॉ सिल्क

मलबरी सिल्क हे सगळ्यात जास्त दणकट असते, त्यानंतर इतर प्रकार. रॉ त्यामनाने नाजुक असते. सगळ्याच रेशमी कापडांची विशेष काळजी घ्यावी लागते.  पण ते कापड आपल्या ठेवणीत असण्याची आणि मिरवण्यातली श्रीमंती काही वेगळीच!

Comments