श्लोक २ - मेघदूत



 तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी
नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः ।
आषाढस्य प्र(श)थमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥ २ ॥

शब्दार्थ: 

अद्रि : पर्वत. 

विप्रयुक्त ; विरही. separated. अबलाविप्र्युक्त: - विप्रयुक्त झाल्याने अबल - बलरहीत 

प्रकोष्ठ: कोपर व मनगटामधला बाहूचा भाग. कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः - सोन्याचं कडं पडून रिकामं प्रकोष्ठ.   विरहतापाने  कृश झाल्याने वलय पडून गेले त्याचे यक्षाला भान नाही

आश्लिष्ट - आच्छादित - Embraced, clasped. सानु - शिखर. 

वप्रक्रीडा: धडक देण्याची, उखडण्याचा खेळ/लीला.  उत्खातकेली.

 तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी
नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः ।
आषाढस्य प्र(श)थमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥ २ ॥

स कामी मेघमाश्लिष्टसानुं ददर्श 
स कामी यक्ष कसा? कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः आणि अबलाविप्रयुक्त
मेघमाश्लिष्टसानुं  कसे दिसत होते? वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं  - तटाला धडक देऊन उखडून टाकणाऱ्या हत्तींसारखे, तिरके वाकलेले. 
कोणाचे शिखर? - तस्मिन्नद्रौ - त्या पर्वताचे - रामटेक चे
कधी दिसले - आषाढस्य प्र(श)थमदिवसे  - आषाढाच्या  पहिल्या अथवा शेवटच्या दिवशी. काही महिन्यांनंतर. (आठ महिने असे अनुमान कारण पुढे एके ठिकाणी यक्ष म्हणतो की अजुन चार महिने राहिलेत.)

Notes
  • आषाढाच्या प्रथम दिवशी विरही यक्षाला मेघांनी अवगुंठित शिखर दिसले, ते मेघ तटाला धडक देणाऱ्या हत्तींसारखे दिसत होते
  • पर्वत शिखरावर हत्तीही फिरत असतील आणि मेघही जे एकमेकांसारखे दिसत आहेत. हा संदेहालंकार आहे
  • धडका देणारे हत्ती दिसणे हा कार्यारंभी शुभ संकेत आहे. मत्तगजदर्शनात्‌ कार्यसिद्धिर्भवतिति सूचितम्‌(दक्षिणावर्त) 



Comments